सातबारा उतारा (Digital Satbara utara 7/12 online) म्हणजेच आपल्या जमिनीचा महत्त्वाचा दस्तावेज. याचबरोबर महाभुलेख महाभुमी 8अ मालमत्ता पत्रक ऑनलाईन कसे पहावे याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत.
योजनेचे नाव: | भूलेख महाभूमि, Digital Satbara Mahabhulekh, Maharashtra |
सुरुवात कोणा द्वारे झाली: | जमाबंदी आयुक्त आणि भूमि अभिलेख महाराष्ट्र राज्य |
लाभार्थी: | महाराष्ट्राचे नागरिक, शेतकरी, जमिनीचे मालक व इतर |
योजनेचा हेतू: | ऑनलाईन सातबारा बघणे, भूमि अभिलेख पाहणे |
Satbara online website: | Bhulekh.mahabhumi.gov.in |
Digital Satbara link: | DigitalSatbara.mahabhumi.gov.in |
Maha Bhulekh (महाराष्ट्र भूमी अभिलेख) – महाराष्ट्र राज्याची भूमी अभिलेख वेबसाइट जी नागरिकांना 7/12 उतारा, 8A उतारा आणि मालमत्ता कार्ड ऑनलाइन प्रदान करते.
महाभुलेख वेबसाईट वरील सातबारा उतारा फक्त आपल्या माहितीसाठी उपयोगी असतो. तर DigitalSatbara.mahabhumi.gov.in वेबसाईट वरील डिजिटल सातबारा सर्व शासकीय निम शासकीय कामांसाठी उपयोगी असतो.

७/१२ पाहण्यासाठी वरील दोन्ही पद्धती पाहूया:-
विना स्वाक्षरीत 7/12 online बघणे Bhulekh mahabhumi
- विना स्वाक्षरीत ऑनलाईन सातबारा पाहण्यासाठी बघण्यासाठी प्रथम Maha Bhulekh Mahabhumi वेबसाईट ओपन करा.
- महाराष्ट्रातील सहा विभागापैकी आपला विभाग निवडा/Select Division- अमरावती, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), कोकण, नागपूर, नाशिक, पुणे
- आपण या ठिकाणी उदाहरणासाठी पुणे विभाग निवडू या.
- यानंतर ७/१२ पहाण्यासाठी जिल्हा निवडा पुणे. (कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर यांच्यापैकी एक)
- याचबरोबर तालुका व गाव निवडा.
- उदाहरणासाठी आपण तालुका बारामती व गाव सुद्धा बारामती निवडुया.
- सातबारा शोधण्यासाठी सर्वे नंबर / गट नंबर पहिले नाव, मधील नाव, आडनाव संपूर्ण नाव यापैकी एक निवडा.
- आपण गट नंबर सर्वे नंबर घेऊया.
- गट नंबर सर्वे नंबर निवडल्यानंतर शोधा या बटनावर क्लिक किंवा टच करा.
- योग्य सर्वे नंबर गट नंबर ची निवड करा.
- सातबारा ऑनलाइन बघण्यासाठी मोबाईल नंबर नोंद करा.
- कॅपच्या दिल्याप्रमाणे टाईप करा व नंतर Verify captcha to view 7/12 वर क्लिक/टच करा.
- सातबारा उतारा आपल्या समोर आहे गाव नमुना 7 अधिकार अभिलेख पत्रक व गाव नमुना 12 पिकांची नोंदवही.
- भूलेख महाभुमी या संकेतस्थळावर दर्शविलेली माहिती कोणत्याही शासकीय किंवा कायदेशीर बाबींसाठी वापरता येणार नाही ही सूचना प्रत्येक ठिकाणी दिलेली आहे.
- शासकीय ठिकाणी कायदेशीर वापरासाठी ७/१२ उतारा DigitalSatbara.mahabhumi.gov.in या वेबसाईटवरून डाऊनलोड करण्यास मिळेल.
8A Utara ऑनलाइन बघणे
8A Utara- गाव नमुना 8अ यालाच आपण धारण जमिनीची नोंदवही किंवा आसामीवार खतावणी जमाबंदी पत्रक असेही म्हणतो.
- आठ अ उतारा पाहण्यासाठी बघण्यासाठी bhulekh.mahabhumi.gov.in वेबसाईट ओपन करा
- महाराष्ट्रातील सहा विभागापैकी आपला योग्य विभाग निवडा/Select Division- अमरावती, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), कोकण, नागपूर, नाशिक, पुणे
- आपण या ठिकाणी उदाहरणासाठी पुणे विभाग निवडू या.
- यानंतर 8अ पहाण्यासाठी जिल्हा निवडा पुणे. (कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर यांच्यापैकी एक)
- याचबरोबर तालुका व गाव निवडा.
- उदाहरणासाठी आपण तालुका बारामती व गाव सुद्धा बारामती निवडुया.
- 8A शोधण्यासाठी खाता नंबर पहिले नाव, मधील नाव, आडनाव संपूर्ण नाव यापैकी एक निवडा.
- आपण खाता नंबर घेऊया.
- 8अ ऑनलाइन बघण्यासाठी मोबाईल नंबर नोंद करा.
- कॅपच्या दिल्याप्रमाणे टाईप करा व नंतर Verify captcha to view 8a वर क्लिक/टच करा.
- गाव नमुना 8अ धारण जमिनीची नोंदवही किंवा एकूण जमिनीचा दाखला जमाबंदी पत्रक आपल्यासमोर आहे.
- या ठिकाणी सुद्धा दर्शविलेली माहिती फक्त आपल्या माहितीस्तव आहे कायदेशीर बाबींसाठी आपण याला वापरू शकत नाहीत.
- कायदेशीर किंवा शासकीय बाबींसाठी वापरण्यासाठी आठ अ आपणास डिजिटल सातबारा महाभुमी (DigitalSatbara.mahabhumi.gov.in) या वेबसाईटवर डाउनलोड साठी उपलब्ध आहे.
मालमत्ता पत्रक (Property Card) ऑनलाईन बघणे
- मालमत्ता पत्रक Property card online बघण्यासाठी अधिकृत वेबसाईट bhulekh.mahabhumi.gov.in वेबसाईट ओपन करा
- महाराष्ट्रातील सहा विभागापैकी Property card पाहण्यासाठी विभाग निवडा/Select Division- अमरावती, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), कोकण, नागपूर, नाशिक, पुणे
- आपण Property card साठी पुणे विभाग निवडू या.
- यानंतर Property card मालमत्ता पत्रक पहाण्यासाठी जिल्हा निवडा पुणे. (कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर यांच्यापैकी एक)
- याचबरोबर तालुका व गावाची निवड करा.
- उदाहरणासाठी आपण तालुका- उपअधीक्षक भूमी अभिलेख बारामती व गाव/गावपेठ सुद्धा बारामती वॉर्ड नंबर 1 निवडुया.
- Property Card शोधण्यासाठी CTS No. /न. भु.क्र, पहिले नाव, मधील नाव, आडनाव व नाव शोधा यापैकी कोणत्याही एक निवडा.
- आपण CTS No. /नगर भूमापन क्रमांक घेऊया.
- Property Card online बघण्यासाठी मोबाईल नंबर नोंद करा.
- कॅपच्या दिल्याप्रमाणे टाईप करा व नंतर Verify captcha to Property Card वर क्लिक/टच करा.
- मालमत्ता पत्रक नगर भूमापन क्रमांक सह आपल्यासमोर आहे.
- या वेब पोर्टल वर दर्शविलेली माहिती फक्त आपल्या माहितीस्तव आहे कायदेशीर बाबींसाठी आपण याला वापरू शकत नाहीत.
- कायदेशीर किंवा शासकीय निमशासकीय बाबींसाठी वापरण्यासाठी Property Card आपणास DigitalSatbara.mahabhumi.gov.in या वेबसाईटवर डाउनलोड साठी उपलब्ध आहे.
डिजिटल सातबारा डाऊनलोड करणे
(सविस्तर पाहण्यासाठी वरील लिंकवर क्लिक करा)
- प्रथम Digitalsatbara.mahabhumi.gov.in वेबसाईटवर स्वतःची नोंदणी करा.
- Digital satbara utara डाऊनलोड करण्यासाठी जिल्हा तालुका व गाव निवडा.
- जमिनीचा गट क्रमांक सर्वे नंबर शोधा / निवडा .
- महाभुमी पोर्टलवर ऑनलाइन शुल्क भरा.
- डिजिटल सातबारा डाऊनलोड करा.