Digital Satbara Mahabhumi gov in अशी वेबसाईट आहे ज्या ठिकाणी आपणास डिजिटल स्वाक्षरी केलेले 7/12 डिजिटल 8 अ व मालमत्ता पत्रक Property Card डाउनलोड करून मिळते.महाभूमी वेब पोर्टल सेटलमेंट कमिशनर भूलेख महसूल विभाग महाराष्ट्र यांनी तयार केले आहे. ज्यामुळे महाराष्ट्र राज्यातील सर्व जमिनीच्या अधिकाराचे digital signed Record मिळण्यास मदत मिळते.
Table of Contents
योजनेचे नाव: | डिजिटल सातबारा आपला ७/१२ Mahabhumi Mahabhulekh, Bhulekh Mh |
कोणा द्वारे तयार केले: | सेटलमेंट कमिशनर महसूल विभाग, महाराष्ट्र शासन |
लाभार्थी: | भूधारक,शेतकरी, जमिनीचे मालक व इतर |
योजनेचा हेतू: | डिजिटल सातबारा 8अ मालमत्ता पत्र प्राप्त करणे डाउनलोड करणे |
अधिकृत वेबसाइट लिंक: | Digitalsatbara.mahabhumi.gov.in |
Digital Satbara Mahabhumi पोर्टल वर लॉगिन
डिजिटल सातबारा महाभुमी या वेब पोर्टलवर लॉगिन करण्याची पद्धत खाली दिलेली आहे.
Digital Satbara Mahabhumi Login
- डिजिटल सातबारा उतारा प्रॉपर्टी कार्ड 8अ प्राप्त करण्यासाठी अधिकृत वेबसाईट digitalsatbara.mahabhumi.gov.in ही लिंक ओपन करा. येथे क्लिक करा.
- यावेळी पोर्टलवर माहिती प्राप्त करण्यासाठी सर्वप्रथम स्वतःची नोंदणी करून घ्या म्हणजेच न्यू युजर रजिस्ट्रेशन करा.
- महाभुमी पोर्टलवर New User Registration करण्यासाठी प्रथम येथे क्लिक करा.
- न्यू यूजर रजिस्ट्रेशन साठी आपली वैयक्तिक माहिती, आपला पत्ता, आयडी आणि पासवर्ड या ठिकाणी लिहा व जतन करून ठेवा.
- मोबाईल रिचार्ज सारखे या ठिकाणी तुम्हाला रिचार्ज सुद्धा करायचा आहे.
- रिचार्ज केल्यानंतर अवेलेबल बॅलन्स आपणास दिसून येते.
- डिजिटल सातबारा प्रॉपर्टी कार्ड ८ अ डाउनलोड करण्यासाठी आपल्याला महाभुमी वेब पोर्टलवर शासकीय शुल्क आकारले जाईल ते देणे आवश्यक आहे.
- हे शुल्क 15 रुपयापासून 85 रुपयापर्यंत किंवा महानगर पालिके मध्ये त्याहूनही अधिक असू शकते.
- शुल्क न आकारता हेच दस्तावेज फक्त माहितीस्तव पहावयाचे असेल तर Bhulekh mahabhumi gov in या वेबसाईटवर आपण ते पाहू शकतो. (विना स्वाक्षरीत ७/१२, ८अ व मालमत्ता पत्रक)
DIGITAL SATBARA कसे डाऊनलोड करावे ?
- सातबारा डाऊनलोड करण्यासाठी प्रथम Digitalsatbara.mahabhumi.gov.in वेबसाईटवर वरील प्रमाणे स्वतःची नोंदणी करा.
- डिजिटल सातबारा महाभुमी वेबसाईट ओपन करून लॉगिन करा.
- डिजिटल ७/१२ उतारा पहण्यासाठी जिल्हा निवडा, तालुका निवडा व गाव निवडा.
- त्यासोबत जमिनीचा सर्वे नंबर/गट नंबर शोधा/निवडा.
- डिजिटल सातबारा डाऊनलोड करण्यासाठी महाभुमी पोर्टलवर ऑनलाइन शासकीय शुल्क भरा.
- शुल्क/ पेमेंट भरल्यानंतर डाउनलोड बटन दाबा व डिजिटल esign 7/12 डाऊनलोड करा.
- या ठिकाणी डाउनलोड संबंधित कोणताही एरर दिसत असेल किंवा डाउनलोड झाले नसेल तर पेमेंट हिस्ट्री या पर्यायावर जा व त्या ठिकाणावरून डाऊनलोड करा.
- Digital satbara utara सर्व प्रकारच्या शासकीय व कायदेशीर बाबींसाठी वापरता येईल.
DIGITAL SIGNED 8A कसे डाऊनलोड करावे?
- 8A डाऊनलोड करण्यासाठी प्रथम Digitalsatbara.mahabhumi.gov.in वेबसाईटवर स्वतःची नोंदणी करा.
- डिजिटलसातबारा महाभुमी वेबसाईट ओपन करून लॉगिन करा.
- आठ अ उतारा पहण्यासाठी जिल्हा निवडा, तालुका निवडा व गाव निवडा.
- या ठिकाणी आपल्याला खाता क्रमांक पहिले नाव, मधले नाव व आडनाव असे पर्याय दिसत आहे .
- वरीलपैकी आपल्याजवळ असलेला योग्य पर्याय निवडा.
- 8A डाऊनलोड करण्यासाठी महाभुमी पोर्टलवर ऑनलाइन शासकीय शुल्क ₹ 15 भरा.
- शुल्क/ पेमेंट भरल्यानंतर डाउनलोड बटन दाबा व डिजिटल esign ८अ डाऊनलोड करा.
- या ठिकाणी Digital 8A डाउनलोड झाले नसेल तर पेमेंट हिस्ट्री या पर्यायावर जा व त्या ठिकाणावरून डाऊनलोड करा.
- Digital 8A utara सर्व प्रकारच्या शासकीय व कायदेशीर बाबींसाठी वापरता येईल.
DIGITAL FERFAR कसे डाउनलोड करावे?
- डिजिटल फेरफार डाऊनलोड करण्यासाठी प्रथम Digitalsatbara.mahabhumi.gov.in पोर्टलवर स्वतःची नोंदणी करा.
- Digital satbara mahabhumi वेबसाईट ओपन करून लॉगिन करा.
- स्वाक्षरीत फेरफार उतारा पहण्यासाठी जिल्हा निवडा, तालुका निवडा व गाव निवडा.
- त्यासोबत जमिनीचा फेरफार नंबर भरा.
- स्वाक्षरीत फेरफार डाऊनलोड करण्यासाठी महाभुमी पोर्टलवर ऑनलाइन शासकीय शुल्क पंधरा रुपये भरा.
- शुल्क/ पेमेंट भरल्यानंतर डाउनलोड बटन दाबा व डिजिटल esign फेरफार डाऊनलोड करा.
- या ठिकाणी डाउनलोड बटन दाबल्यानंतर एरर दिसत असेल किंवा डाउनलोड झाले नसेल तर पेमेंट हिस्ट्री या पर्यायावर जा व त्या ठिकाणावरून डाऊनलोड करा.
- Digital Ferfar utara सर्व प्रकारच्या शासकीय व कायदेशीर बाबींसाठी वापरता येईल.
DIGITAL PROPERTY CARD कसे डाऊनलोड करावे?
- डिजिटल मालमत्ता पत्रक डाऊनलोड करण्यासाठी प्रथम Digitalsatbara.mahabhumi.gov.in वेब पोर्टलवर स्वतःची नोंदणी करा.
- महाभुमी वेबसाईट ओपन करून लॉगिन करा.
- डिजिटल प्रॉपर्टी कार्ड उतारा पहण्यासाठी जिल्हा निवडा, नगर भूमापन अधिकारी कार्यालय निवडा व गाव/पेठ निवडा.
- सी.टी.एस नंबर. (CTS No.) नंबर भरा.
- स्वाक्षरीत मालमत्ता पत्रक डाऊनलोड करण्यासाठी महाभुमी पोर्टलवर ऑनलाइन शासकीय शुल्क 45 रुपये भरा.
- नगरपरिषद महानगरपालिका जिल्हास्तर व मेट्रो शहर प्रमाणे शुल्क 90 रुपये किंवा 135 रुपये असू शकतात.
- शुल्क/ पेमेंट भरल्यानंतर डाउनलोड बटन दाबा व डिजिटल स्वाक्षरीत/eSign प्रॉपर्टी कार्ड मालमत्ता पत्रक डाऊनलोड करा.
- येथे डाउनलोड बटन दाबल्यानंतर एरर दिसत असेल किंवा डाउनलोड झाले नसेल तर पेमेंट हिस्ट्री या पर्यायावर जा व त्या ठिकाणावरून digital property card डाऊनलोड करा.
- Digital property card utara सर्व प्रकारच्या शासकीय व कायदेशीर बाबींसाठी वापरता येईल.
DIGITAL SIGNED eRECORDS कसे डाऊनलोड करावे?
- डिजिटल साईड इ रेकॉर्ड्स म्हणजेच जुने कागदपत्रांची काढलेली छायाचित्रे
- जमिनीच्या मालकी हक्काचे नामांतर म्हणजेच फेरफार हे एका जमिनी बाबतीत किती वेळा झालेली असतात.
- आज आपण जी जमीन विकत घेतलेली आहे ती जमीन पूर्वी कोणाची होती आणि त्यापूर्वी कोणाची होती. असे सर्व प्रकारचे जुने फेरफार तहसील कार्यालयात जुन्या रजिस्टर मध्ये असतात.
- या ठिकाणी अनेक प्रकारची जुने दस्तावेज उपलब्ध आहेत.
- ही सर्व जुनी कागदपत्रे आपणास आता ई रेकॉर्ड्सच्या माध्यमातून मिळणार आहेत.
- सध्या जुन्या कागदपत्रांची डिजिटल स्वाक्षरी प्रक्रिया कार्यालयात युद्ध पातळीवर चालू आहे .
- ही कागदपत्रे आपणास फक्त पहावयाची असेल तर https://aapleabhilekh.mahabhumi.gov.in/erecords या संकेतस्थळावर स्वाक्षरी नसलेली कागदपत्रे आपण बघू शकतो.