आपली चावडी म्हणजे आपल्या गावाची नोटीस बोर्ड लावण्याची जागा. नवीन डिजिटल नोटीस बोर्ड महाराष्ट्राच्या महसूल विभागाने तयार केले आहे. या डिजिटल नोटीस बोर्ड आपली चावडीवर तलाठी गिरधावर किंवा संबंधित तहसील ग्रामपंचायत अधिकाऱ्यांकडून खरेदी विक्रीची मोजणीची नोटीस लावण्यात येते.
सातबारा (फेरफार) मालमत्ता पत्रक फेरफार मोजणीची नोटिसेस स्वामित्व नोटिसेस eQJCourt नोटिसेस पिक पाहणी अशा प्रकारच्या नोटिसेस आपल्याला डिजिटल नोटीस बोर्ड आपली चावडीवर बघायला मिळते .
Table of Contents
Aapli chawdi सातबारा फेरफार (eChavdi 7/12)
आपल्या गावामध्ये कोणत्याही प्रकारची जमिनीची खरेदी विक्री जर झाली असेल, खरेदी विक्रीची संक्षेप मध्ये माहिती या ठिकाणी दिलेली असते.रजिस्ट्री खरेदी खत झाल्यानंतर तलाठी मार्फत फेरफार होणे बंधनकारक असते. फेरफार नोंदी संबंधित हरकत पंधरा दिवसाच्या आत घेणे आवश्यक असते.
फेरफार चा प्रकार कोणता आहे व कसा आहे पुढील प्रमाणे आपल्या चावडीवर पहा –
- सर्वप्रथम https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/aaplichawdi वेबसाईट पोर्टल आपल्या ब्राउझर मध्ये ओपन करा.
- Aapli Chawdi पोर्टलवर सातबारा (फेरफार) रेडिओ बटन सेलेक्ट किंवा क्लिक करा.
- यानंतर जिल्हा, तालुका, गाव यांची योग्य पद्धतीने निवड करा .
- Captcha बिनचूक लिहा व आपली चावडी पहा या हिरव्या रंगाच्या बटणावर क्लिक करा.
- या ठिकाणी सातबारा (फेरफार) खरेदी खत मधील सर्व माहिती दिसेल जसे-
- सातबारा फेरफार क्रमांक दिसेल,
- खरेदी झालेला नामांतरण झालेला मालमत्तेचा फेरफार प्रकार, (खरेदी, बोजा, बोजा कमी करणे, आदेश व दस्तावेज, हक्क सोड पत्र/ रिलीज डीड, वारस, वाटपाने / वाटणीपत्राने व इतर फेरफार)
- फेरफार ज्या दिवशी झाला तो दिनांक,
- हरकत तक्रार नोंदविण्याची शेवटची तारीख दिसेल, (फेरफार दिनांक झाल्यानंतर पंधरा दिवस)
- या ठिकाणी खरेदी झालेला जमिनीचा सर्वे नंबर/ गट क्रमांक दिसेल.
- झालेल्या फेरफार संबंधित अधिक माहितीसाठी सर्वात शेवटी असणाऱ्या पहा या बटन वर क्लिक करा.
- महाराष्ट्र शासन जमीन महसूल अधिनियम, 1966 यांच्या कलम 150(2) अन्वये सूचना या ठिकाणी स्पष्ट रूपात छापलेले दिसते.
- या ठिकाणी फेरफार नोंदीचा प्रकार, लिहून देणार, लिहून घेणार, खरेदी दस्त क्रमांक, खरेदी किंमत, सर्व महत्त्वपूर्ण नोंदी दिसतात.
Read Also: महाभुलेख 7/12 उतारा व 8अ मालमत्ता पत्रक Online पहा
Faqs:
आपली चावडी म्हणजे काय?
आपली चावडी म्हणजे आपल्या गावाची नोटीस बोर्ड लावण्याची जागा. नवीन डिजिटल नोटीस बोर्ड महाराष्ट्राच्या महसूल विभागाने तयार केले आहे.
फेरफार नोंदी संबंधित हरकत पंधरा दिवसाच्या आत घेणे आवश्यक असते. या डिजिटल नोटीस बोर्ड आपली चावडीवर तलाठी किंवा संबंधित तहसील ग्रामपंचायत अधिकाऱ्यांकडून खरेदी विक्रीची मोजणीची नोटीस लावण्यात येते.
सातबारा (फेरफार) मालमत्ता पत्रक फेरफार मोजणीची नोटिसेस स्वामित्व नोटिसेस eQJCourt नोटिसेस पिक पाहणी अशा प्रकारच्या नोटिसेस आपल्याला डिजिटल नोटीस बोर्ड आपली चावडीवर बघायला मिळते .